Satyagraha movement of Congress in Yawal with Bhusawal भुसावळसह यावलला काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व परीवाराला ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याचा आरोप


Satyagraha movement of Congress in Yawal with Bhusawal  भुसावळ : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व परीवारातील सदस्यांचा ईडीच्या माध्यमातून त्रास देवून केंद्रातील मोदी सरकार छळ करीत असल्याच्या निषेधार्थ भुसावळ विभागात मंगळवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकार्‍यांनी दिवसभर शांततामय मार्गाने आंदोलन करीत प्रशासनाला निवेदन दिले. भुसावळातील पदाधिकार्‍यांनी सत्याग्रह आंदोलन केले तर यावल शहरात धरणे आंदोलन करण्यात आले.

यावलला धरणे आंदोलन
यावल : तालुका काँग्रेस कमेटी व शहर काँग्रेस कमेटीच्या वतीने भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी व परीवारावर द्वेषापोटी (ईडी) चौकशी लावणार्‍या मोदी सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार शिरीष चौधरी, प्रभाकर आप्पा सोनवणे, हाजी शब्बीर खान, आर.जी.नाना पाटील, शेखर बापू पाटील, शहराध्यक्ष कदीर खान, चंद्रकला इंगळे, नगरसेवक कलीम खान, नगरसेवक सायद युनूस, सतीश आबा पाटील, नगरसेवक रसूल शेठ, नगरसेवक शेख अस्लम, नगरसेवक शेख रीयाज, नगरसेवक समीर खान, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक शेख जाकीर, अमोल भिरूड, सरपंच संदीप सोनवणे, जलील पटेल, अजय भालेराव, विकी पाटील, डॉ.पालवे, उमेश जावळे, फैझान शाह, रहेमान खाटीक, शेख अझहर, पिरान तडवी, इम्रान पहेलवान, विक्की गजरे, अशफाक शाह, सुपडू तडवी, नईम भाई, शेख सकलेन, लिलाधर सोनवणे, निसार भाई, अमर कोळी, सर्फराज शाह, चेतन सोनवणे, करीम मेंबर, रशीद मण्यार, वासीम शेख, आसीफ शेख, महिंद्रा सोनवणे, विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती.



भुसावळला सत्याग्रह आंदोलन
भुसावळ :
मोदी सरकारचा भुसावळ शहर काँग्रेस कमेटीतर्फे निषेध करण्यात आला. देशामध्ये महागाई, बेरोजगारी वाढत असून दुसरीकडे अग्निपथ योजनेला होणारा विरोध तसेच आर्थिक दिवाळखोरी सुरू असताना जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपा मोदी सरकार करीत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र निकम, जिल्हा अल्पसंख्यांक कमेटीचे अध्यक्ष मो.मुन्वर खान, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष यास्मीन बी., शहर उपाध्यक्ष सुजाता सपकाळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला.

यांची होती उपस्थिती
भुसावळातील आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष साळवे, राजेश डोंगरदिवे, युवक प्रदेश सचिव इम्रान खान, शहर उपाध्यक्ष मेहबूब खान, हमीद शेख, अजगर भाई, राम अवतार परदेशी, शहर सेवा दल अध्यक्ष संजय खडसे, वरणगाव शहराध्यक्ष अशफाक काझी, जॉनी गवळी, सचिन गायकवाड, बाळा सुरडकर, प्रकाश सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवापूरात खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात बसची स्कुटरला धडक : भडणे गावातील विवाहिता ठार


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !