आव्हाणेचा तरुण गिरणा नदीत बुडाला


Avhana’s young man drowned in the river जळगाव : आव्हाणे येथील तरुण गिरणा नदीच्या पुलावरून पायी घरी जात असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहून गेला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. संदीप बाजीराव पाटील (40, आव्हाणे, ता.धरणगाव) असे पाण्यात बुडून वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

कामावरून परतताना दुर्घटना
संदीप पाटील हा आव्हाणे शिवारातील राष्ट्रीय महामार्गावरील एका ठेकेदाराकडे कामाला होता. नेहमीप्रमाणे तो मंगळवार, 26 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कामावरून गिरणा नदीच्या पुलावरून पायी जात होता. अचानक त्याचा पाय घसल्याने तोल जावून पाण्यात पडल्याने तो गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो पाण्यात बुडाला. हा प्रकार भोकनी गावातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने पाळधी पोलीस ठाण्याला कळविले.



निकृष्ट कामामुळे रावेर न.पा.च्या नवीन इमारतीची भिंत पडली


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !