Jalgaon Tehasil ACB Trap दोन हजारांची लाच भोवली : जळगाव तहसीलचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात
Bribe of 2000 : Constable of Jalgaon Tehsil in ACB’s Net जळगाव : संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तजडजोडीअंती दोन लाच स्वीकारताना जळगाव तहसील कार्यालयातील शिपाई मगन गोबा भोई (52, वाघनगर, जळगाव) यास बुधवारी दुपारी एक वाजता जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने महसूल प्रशासनातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सुनावले : तर एकनाथ शिंदे उद्या पंतप्रधानपदही मागतील !
तडजोडीअंती कार्यालयातच स्वीकारली लाच
जळगावातील 35 वर्षीय तक्रारदार या घटस्फोटीत आहे. त्यांच्या आई विधवा असल्याने त्यांनी संजय गांधी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जळगावातील रेल्वे स्थानकाजवळील नगरपालिका क्षेत्र कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेखाली अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यास बराच कालावधी झाल्याने तक्रारदाराने कार्यालय गाठून भोई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदारासह त्यांच्या आईच्या नावे अनुदान मंजुर करून आणून देतो व त्या मोबदल्यात पाच हजारांची लाच बुधवारी मागितली तर आईचे अनुदान मंजूर करण्यासाठी तीन हजार तर तक्रारदाराच्या अनुदानासाठी दोन हजार मिळून एकूण पाच हजारांची लाच मागितली मात्र दोन्ही प्रकरणात तडजोड होवून चार हजार देण्याचे ठरले व प्रथम तक्रादाराच्या आईचे अनुदान मंजुर करून आणून देण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचपडताळणी होवून सापळा रचण्यात आला. आरोपीने पंचांसमक्ष तहसीलदार संजय गांधी योजना महानगरपालिका क्षेत्र कार्यालयात लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली.



यांच्या पथकाने केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकुर, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने यशस्वी केला.