बंद फॅक्टरीत चोरी : आरोपी अडकला जाळ्यात


जळगाव : एमआयडीसी परीसरातील गिता इंडस्ट्रीजमधून अल्यूमिनीअमचे कॉईल आणि केबल वायरचे बंडल चोरून नेणार्‍या संशयित आरोपीला सुप्रिम कॉलनीतून अटक करण्यात आली तर दुसरा पसार झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष मोहन चव्हाण (55, रा.पांडे किराणा समोर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात दाखल होता गुन्हा
एमआयडीसी सेक्टर मधील ई-32 मध्ये असलेल्या गीता इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीत इलेक्ट्रिक वायर बनवण्याची कंपनी आहे. दरम्यान 19 जुलै मध्यरात्री कंपनी बंद असतांना संशयित आरोपी संतोष मोहन चव्हाण रा. सुप्रीम कॉलनी याने कंपनीचे शटरचे लॉक तोडून कंपनीतून 59 हजार रुपये किमतीचे अल्युमिनियमचे कॉइल आणि सर्व्हिस वायरचे बंडल असा मुद्देमाल चोरून नेले होते. याबाबत कंपनीचे मालक राहुल प्रताप गुरुनानी (रा. गायत्री नगर, शिरसोली रोड, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.




यांनी केली आरोपीला अटक
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळकसर, सुधीर सावळे, इम्रान अली सैय्यद, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, सतीष गर्जे यांनी आरोपी संतोष मोहन चव्हाण (55, रा.पांडे किराणा समोर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास अटक केली. आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

24 वर्षीय तरुणाने मध्यरात्री घेतला गळफास : जळगाव जिल्ह्यातील या गावातील घटना


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !