A Two Weheeler Thief Caught in the Police Net of Bhusawal Market भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात अडकला दुचाकी चोरटा
A Two Weheeler Thief Caught in the Police Net of Bhusawal Market भुसावळ : दुचाकी चोरट्याच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी मुसक्या आवळल्या असून आरोपीच्या ताब्यातून चोपडा शहरातून महिन्याभरापूर्वी चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. कृष्णा उर्फ मिलिंद शुटर गायकवाड (मुन्सीपल हायस्कूलमागे, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीला अधिक तपासार्थ चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
गोपनीय माहितीवरून अटक
भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आरोपी मिलिंद गायकवाडबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. मंगळवारी पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्या ताब्यातून 45 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपीने महिनाभरापूर्वीच ही दुचाकी चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून लांबवल्याची कबुली दिली आहे.



यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नेरकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल जीवन कापडे, नाईक दिनेश कापडणे यांच्या पथकाने केली.