Fake Disability Certificate: Interim Relief To Six Gramsevaks of Rawer Taluka अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र : रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांना अंतरीम दिलासा


Fake Disability Certificate: Interim Relief To Six Gramsevaks of Rawer Taluka रावेर : अपंग नसताना बनावट व खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे तालुक्यातील सहा ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदलीचा लाभ घेतला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाहोता. संशयीत ग्रामसेवकांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन 29 जुलैपर्यंत मंजूर केल्याने या ग्रामसेवकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा
निंबोल येथील किशोर भिवा तायडे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. यात न्यायालयाने शिवाजी गुलाबराव सोनवणे, राहुल रमेश लोखंडे, छाया रमेश नेमाडे, नितीन दत्तू महाजन, रवींद्रकुमार काशीनाथ चौधरी व शामकुमार नाना पाटील या ग्रामसेवकांच्या विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आता त्यांना अल्प काळासाठी अटकेपासून संरक्षण मिळाले असले तरी आता 29 तारखेनंतर काय होणार ? याकडे परीसराचे लक्ष लागले आहे.




मुक्ताईनगर तालुक्यातील गणांचे आरक्षण जाहीर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !