यावल तालुक्यात महिला आरक्षणामुळे इच्छुकांचा हिरमोड


यावल : पंचायत समितीच्या 12 गणातील आरक्षण सोडत यावल तहसील कार्यालयात गुरुवारी सकाळी जाहीर करण्यात आले. अनुसूचित जमाती व ओबीसी महिलांच्या जागेकरीता सोडत काढण्यात आली. तालुक्यात ओबीसी प्रवर्गाकरीता एक जागा मिळाली असून ती देखील महिलांसाठी राखीव झाल्याने इच्छूकांचा हिरमोड झाला आहे. तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या 12 गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

असे आहे तालुक्यातील आरक्षण
यावल तालुक्यातील 12 गणात अनुसूचित जमातीकरीता चार जागा असून ात दोन महिला, अनुसुचित जाती व ओबीसी (महिला) करीता एक जागा तर सर्वसाधारण करीता सहा जागा असून यातील तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत तर काही गणात महिलांचे पुन्हा आरक्षण निघाल्याने इच्छुकांचा पुरता हिरमोड झाला. प्रसंगी तहसीलदार महेश पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, सुयोग पाटील उपस्थित होते.




तालुकानिहाय आरक्षण असे- नायगाव- अनुसूचित जमाती महिला (एस.टी.), किनगाव बुद्रुक- अनुसुचित जमाती (एस.टी.), सावखेडासीम- अनुसुचित जमाती (एस.टी.), दहिगाव- सर्वसाधारण, मारूळ- सर्वसाधारण, न्हावी- सर्वसाधारण, बामणोद- अनुसुचित जाती, हिंगोणा- सर्वसाधारण महिला, डांभूर्णी- अनुसूचित जमाती महिला (एस.टी), साकळी- सर्वसाधारण महिला, भालोद- सर्वसाधारण महिला, पाडळसे- ओबीसी महिला.

अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र : रावेर तालुक्यातील सहा ग्रामसेवकांना अंतरीम दिलासा


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !