मोठी बातमी : दहिगाव स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्नाने खळबळ

एक संशयीत चौकशीकामी ताब्यात : एटीएम मशीनचे 70 हजारांचे नुकसान


Big News : Dahigaon State Bank ATM attempt to break sensation यावल : बोदवड शहरात अलीकडचे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच यावल तालुक्यातील दहिगाव येथील प्रमुख चौकातील स्टेट बँकेचे एटीएम बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात इसमाने फोडण्याचा प्रयत्न केल्याची बाब गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारावरून एका संशयीतास पोलिसांनी चौकशी कामी ताब्यात घेतले.

एटीएम सुदैवाने न फुटल्याने रोकड सुरक्षीत
दहिगाव, ता.यावल येथील प्रमुख चौकात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम असून हे एटीएम बुधवारी रात्री 12 वाजेनंतर गुरुवारच्या पहाटेच्या सुमारास फोडण्याचा प्रयत्न झाल्याची बाब सकाळी उघडकीस येताच गावात खळबळउ डाली. पोलिस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय अडकमोल यांना कळविले. त्यानुसार त्वरीत दोघांनी यावल पोलिसांना माहिती दिली.




पोलिस उपअधीक्षकांची धाव
घटनास्थळी फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस उपनिरीरक्षक सुदाम काकडे यांनी भेट देत पाहणी केली. ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली असता एकावर संशय आल्याने त्यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. या एटीएममधील रोकड सुरक्षीत असल्याचे बँकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले मात्र एटीएमचा पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्याचा पट्टा तुटल्याने सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळाचा पंचनामा फौजदार सुदाम काकडे, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण यांनी केला.

तज्ज्ञांनी टिपले ठसे
घटनास्थळी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र सातत्याने होत असलेली गर्दी पाहता श्वानाकडून तपासणी करण्यात आली नाही मात्र तज्ज्ञांनी ठसे टिपले. या प्रकरणी यावल पोलिसात स्टेट बँकेचे दीपक दौलत तिवारी यांच्या वतीने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

मराठमोळ्या तरुणीने उंचावली मान : देशातील टॉप टेन धनाढ्यांच्या यादीत नेहा नारखेडेचा समावेश


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !