सांगवी बुद्रुक येथील 35 वर्षीय इसमाची आत्महत्या
Suicide Of 35 Year Old Isam From Sangvi Budruk यावल : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील प्रदीप विजय भंगाळे (35) या युवकाने धुळेपाडा आदिवासी वस्तीवरील शेतालगतच्या पत्रीशेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
याबाबत पोलिसांना माहिती देत मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिसात विजय भंगाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत प्रदीपने आत्महत्या का केली ? हे कळू शकले नाही. मयताच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.


