बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीने तरुणाची आत्महत्या : अडावदच्या सहा जणांविरोधात गुन्हा


Suicide Of A Young Man Under The Threat Of Filing A False Case Of Rape : A Case Against Six Persons of Adavad चोपडा : पैसे न दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करू, अशी धमकी दिल्याने तरुणाने भीतीपोटी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्या प्रवृत्त करणार्‍या सहा जणांविरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शाहिद मुन्ना शेख (20, चोपडा) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बदनामीची धमकी देत मागितली खंडणी
शाहिद मुन्ना शेख हा आपल्या कुटुंबियांसह चोपडा शहरात राहतो. त्याची ओळख शहरातील जरीनाबी मुनसफ शेख हिच्याशी झाला. दरम्यान दोघांची मैत्री असल्यामुळे याचा गैरफायदा घेत जरीनाबी मुनसफ शेख हिने शाहिद मुन्ना शेख याला 20 हजार रुपयाची मागणी केली. दरम्यान शाहिदने 20 हजार रुपये दिले नाही म्हणून जरीनाबी हिने शाहीदला धमकी देत तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून, तुझी बदनामी करू अशी धमकी दिली होती. या धमकीला घाबरून शाहिद मुन्ना शेख याने 22 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.




यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
दरम्यान याप्रकरणी शाहीदचे वडील मुन्ना लतीफ शेख यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्याने जरीनाबी मुनसफ शेख गुलाम रेतीवाले (चोपडा), रुकसाना बी.शेख हसन, शेख गुड्डू शेख गुलाब, शेख काल्या शेख गुलाम, वसीम शेख माजीद शेख (सर्व रा.अडावद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.

मराठमोळ्या तरुणीने उंचावली मान : देशातील टॉप टेन धनाढ्यांच्या यादीत नेहा नारखेडेचा समावेश


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !