दागिण्यांसाठी सराफा दुकानावर आलेल्या महिलेच्या पिशवीतून 80 हजार भामट्याने लांबवले
A woman who came to a bullion shop for jewelery stole 80,000 from her bag शिरपूर : शहरातील सराफ दुकानावर सोन्याचे दागिने बनवण्यासाठी आलेल्या महिलेच्या वायरच्या थैलीमधून अज्ञात चोरट्यांनी 80 हजारांची रोकड लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी मनीषा अशोक मराठे (40, रा.भरतसिंग नगर, शिरपूर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे.
वायरच्या पिशवीला ब्लेड मारून रोकड लांबवली
मनीषा मराठे या मंगळवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सोन्याचे दागिने करण्यासाठी शहरातील सराफ गल्लीमधील नंदुरबारकर जेलर्स दुकानात आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून स्वतःच्या खात्यातून 80 हजारांची रोकड विड्रॉल करीत वायरच्या थैलीत टाकून सराफा दुकान गाठले मात्र अज्ञातांनी महिलेच्या हातातील वायरची थैली काहीतरी तीक्ष्ण हत्याराने कापून थैलीमधील 80 हजाराची रोकड लांबवली.
सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पीएसआय संदीप मुरकुटे आणि शोध पथकाचे कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महिलेने बँकेतून रोकड काढल्यानंतर बँक, बँकेचा परीसर ते सराफा दुकानादरम्यानच्या सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक विनोद सरदार करीत आहे.


