मुकेश अंबानींना धमकी : बिहारातील आरोपी गजाआड
Threat to Mukesh Ambani : Accused in Bihar Gajaad मुंबई : रीलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धीमे मारण्याची धमकी देणार्या राकेश कुमार मिश्राला (30) पोलिसांनी बिहारातून अटक केली.
लॅण्डलाईनवर फोन करीत धमकी
बुधवारी दुपारी 12 वाजून 57 मिनिटांनी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईनवर अनोळखी व्यक्तिने कॉल करून रिलायन्स हॉस्पिटल तसेच अँटिलीयामध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी 5.4 वाजता पुन्हा कॉल करून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, आकाश आणि अनंत अंबानीला जीवेठार मारण्याची धमकी दिली.




आधी केला गुन्हा दाखल
हॉस्पिटल प्रशासनाने याची माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. तर, पोलिसांनी रिलायन्स हॉस्पिटल आणि अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया या ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवली आहे.
दरभंगा भागातून अटक
पोलिस उपायुक्त नीलोत्पल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तो बिहारमध्ये असल्याचे समजताच बिहार पोलिसांच्या मदतीने त्याला बिहारच्या दरभंगा भागातून मध्यरात्री अटक केली आहे. त्याला घेऊन मुंबई पोलिसांचे पथक मुंबईला निघाले असून त्याने असे का केले? याबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिस करीत आहेत.