International Twenty20 Cup : Team India’s Diwali, resounding victory in cricket पाकिस्तानची जिरवली : टीम इंडियाची दिवाळी, क्रिकेटमध्ये दणदणीत विजय
Virat Kohli Scored Half Century And India Beat Pakistan By 6 Wickets In T 20 World Cupमेलबर्न : आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 चषकातील अत्यंत उत्साहवर्धक व रोमांचक ठरलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवत दिवाळीपूर्वी दिवाळी साजरी केली. विराट कोहली व हार्दिक पांड्या यांनी मैदानावरपाकिस्तानच्या गोलंदाजांना यथेच्छ धुतले. या दोघांनी वैयक्तिक विक्रमांचीही नोंद केली. अखेरच्या षटकांमध्ये विराटने पाकिस्तानची चांगलीच जिरवली. विराटने 53 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 82 धावा केल्या.
कोहलीनेचाही ट्वेंटी-20त मोठा पराक्रम
पाकिस्तानच्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात वाईट झाली. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, परंतु पाकिस्तानला आयती विकेट मिळाली. लोकेश (4) , रोहित ( 4), सूर्यकुमार यादव ( 15) व अक्षर पटेल ( 2) असे चार फलंदाज 31 धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पांड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या 10 षटकांत 115 धावांची गरज असताना पाहून विराटने गिअर बदलला. 12व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एका षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना 15 षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला 30 चेंडूंत 60 धावा विजयासाठी हव्या होत्या. खपवळर ती झरज्ञळीींरप ङर्ळींश ढ20 चरींलह




विराट सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
विराट आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त सर्वाधिक 374 धावा करणारा फलंदाज ठरला, त्याने रोहितला (3741) मागे टाकले. दरम्यान हार्दिकनेही ट्वेंटी-20त 1000+ धावा व 50+ विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदवला. ट्वेंटी-20त असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शाहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओ’ब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे. हॅरिस रौफ व नसीम शाह यांनी अनुक्रमे 16 व 17 वे षटक अप्रतिम टाकले. आता भारताला 18 चेंडूंत 48 धावा हव्या होत्या. शाहीनने टाकलेल्या 18व्या षटकात विराटने 17 धावा चोपल्या आणि अर्धशतकही पूर्ण केले. विराट-हार्दिकने 75 चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली.
भारताची दमदार सुरूवात
पहिलाच वर्ल्ड कप खेळणार्या अर्शदीप सिंगने (3-32) भारताला दमदार सुरुवात करून दिली. बाबर आजम (0) व मोहम्मद रिझवान ( 4) हे दोन्ही सलामीवीर 15 धावांत त्याने माघारी पाठवले. इफ्तिखार अहमद व शान मसूद यांनी डाव सावरला आणि 50 चेंडूंत 79 धावांची भागीदारी केली. 34 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकार खेचून 51 धावा करत अहमद बाद झाला. हार्दिकने एका षटकात शादाब खान ( 5) व हैदर अली ( 2) यांची विकेट घेतली. पुढे मोहम्मद नवाजला ( 9) त्याने बाद केले. हार्दिकने 4-0-30-3 अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. 91 धावांवर 2 विकेट्स असणार्या पाकिस्तानने पुढील 29 धावांत पाच विकेट्स गमावल्या. शमीने ( 1-25) चांगली गोलंदाजी केली. अर्शदीपने षटकांत 32 धावांत 3 विकेट्स घेतल्या. शाहिन आफ्रिदीने 8 चेंडूंत 16 धावा चोपल्या, तर मसूद 42 चेंडूंत 5 चौकारांसह नाबाद 52 धावा केल्या. पाकिस्तानने 8 बाद 159 धावा करून चांगले कमबॅक केले.