चीनमध्ये कोरोना कायम : पुन्हा लॉकडाऊनची आली वेळ


Corona continues in China: It’s time for lockdown again नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळून येत असल्याने सरकारकडून झिरो कोव्हिड पॉलिसीअंतर्गत निर्बंध आणि लॉकडाऊन लादले जात आहेत. झेंगझोऊ शहरातही हीच परिस्थिती आहे, ज्यामुळे अ‍ॅपलच्या कारखान्यातून कर्मचारी पळत आहेत.

कर्मचार्‍यांचा कामावरून पळ
चीनमध्ये अ‍ॅपल आयफोन तयार करणारा फॉक्सकॉनचा सर्वात मोठा कारखाना आहे. सरकारने लादलेले निर्बंध टाळण्यासाठी या कारखान्यातील कामगार कंपाउंड वॉलवरुन उड्या मारुन पळ काढत आहेत. कोरोनाबाबत चीन सरकारने लादलेले निर्बंध कर्मचार्‍यांसाठी अडचणीचा विषय ठरत आहेत. याचाच परिणाम म्हणून कर्मचारी कुंपनावरुन उड्या मारुन पळ काढत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !