Parcel bogie of Shalimar-LTT Express catches fire in Nashik नाशिकमध्ये शालिमार-एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग  


Parcel bogie of Shalimar-LTT Express catches fire in Nashik नाशिक : 18030 शालिमार-एलटीटी एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला नाशिक रेल्वे स्थानकावर आग लागल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी 8.43 वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने वेळीच आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने त्यावर नियंत्रण मिळवता आल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे मोठी धावपळ उडाली.

वेळीच सतर्कता आली कामी
नाशिकरोड रेल्वे स्थानक शनिवारी सकाळी पावणेनऊ वाजता 18030 शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस आल्यानंतर पार्सल बोगीतून धूर येत असल्याचे आरपीएफच्या जवानांच्या लक्षात आत्यांनी त्यांनी तातडीने अग्निशमन दलाच्या पथकाला बोलावले व वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने अप्रिय प्रकार टळला. या प्रकारामुळे मात्र काही वेळ प्रवाशांमध्ये थरकाप उडाला होता. दरम्यान, आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला असून पर्यायी इंजिन जोडून ही गाडी एलटीटीकडे रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !