धुळ्यात केंद्रीय समितीकडून 108 रुग्णवाहिकांची तपासणी : कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान
धुळे : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कॉमन रीव्ह्यू मिशन (सीआरएम) समितीने जिल्हा रुग्णालयाची तपासणी केली तसेच रविवारी सायंकाळी 108 रुग्णवाहिकांची बारकाईने तपासणी केली. यावेळी रुणवाहिकेवील डॉक्टर, चालक, ई.एम.एस.कॉर्डिनेटर तसेच बीव्हीजी इंडिया लिमिटेडची टीम प्रसंगी उपस्थित होती.
108 च्या कामकाजाबाबत व्यक्त समाधान
यावेळी 108 चे काम चांगल्या दर्जाचे असल्याचे निरीक्षण समितीतील सदस्यांनी नोंदवले. 108 वाहनांची व्यवस्था अतिशय उत्तम असून स्वच्छता व मेन्टेनन्स समाधानकारक असल्याचे मत समिती सदस्यांनी नोंदवले. रुग्णवाहिकेतील अत्यावश्यक तसेच सर्वच उपकरणे अद्ययावत व सुस्थितीत असून त्याचा योग्य वापर होत असल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले व प्रसंगी डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकनासाठी सीआरएमच्या 14 सदस्यांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे.


