27-hour special traffic and power block for removal of over bridge on Karnak Road in Mumbai: 15 trains and 27 trains short-terminated ओव्हरब्रिज काढण्यासाठी ब्लॉक : 15 रेल्वे गाड्या रद्द
प्रवाशांची होणार गैरसोय : 19 व 20 नोव्हेंबर रोजी 27 मेल, एक्स्प्रेस शॉर्ट टर्मिनेट
27-hour special traffic and power block for removal of over bridge on Karnak Road in Mumbai: 15 trains and 27 trains short-terminated भुसावळ : मुंबईतील कर्नाक रोडवरील ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी 27 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घेतला आहे. शनिवार, 19 व रविवार, 20 नोव्हेंबर रोजी भुसावळ विभागातून मुंबईकडे जाणार्या तब्बल 15 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 27 रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या आहे. मध्य रेल्वेनेे मुंबई विभागात शनिवार, रविवारी (दि. 19, 20) अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान येथे रोड क्रेनचा वापर करून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परीचालीत करणार आहे.
17 तासांचा ब्लॉक
अप आणि डाउन धिम्या मार्गावर शनिवार, 19 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवार, 20 नोव्हेंबर दुपारी चारपर्यत असे तब्बल 17 तासांचा ब्लॉक राहणार आहे. अप आणि डाउन हार्बर मार्गावर शनिवार, 19 रोजी रात्री 11 वाजेपासून ते रविवार, 20 रोजेी रात्री आठ वाजेपर्यंत असेल व 21 तासांचा ब्लॉक राहणार आहे. सातवी मार्गिका आणि यार्ड येथे शनिवार, 19 रोजी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवार, 20 रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत राहील, 27 तासाचा ब्लॉक आहे. रेल्वे सेवा चालू राहणार नाहीत यात अप आणि डाउन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. अप आणि डाउन धिम्या मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अप आणि डाउन जलद मार्गावर भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. या ब्लॉकचा परिणाम लोकल गाड्यावर होणार आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. तसेच मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.




मदत कक्ष सुरू होणार
हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख जंक्शन आणि स्टेशनवर पुरेसे परतावा खिडक्या (रिफंड काउंटर) उघडण्यात येणार आहे. तेथे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्षही सुरू करण्यात येणार आहे.
या गाड्या केल्या रद्द
शनिवार, 19 रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस, अमरावती-मुंबई एक्सप्रेस, सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, जबलपूर-मुंबई गरीबरथ, तसेच रविवार, 20 रोजी रद्द झालेल्या गाड्यांमध्ये मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-जबलपूर गरीबरथ, मुंबई-मनमाड विशेष, मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस, पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे, मनमाड-मुंबई स्पेशल, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे, नांदेड- मुंबई तपोवन एक्सप्रेस, सोमवार, 21 रोजी मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
दादर येथून सुटणार्या या गाड्या रद्द
शनिवार, 19 रोजी दादर येथून सुटणार्या गाड्यांमध्ये मुंबई-अमृतसर एक्सप्रेस तर रविवार, 20 नोव्हेंबर रोजी सुटणार्या गाड्यांमध्ये मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस, मुंबई-लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस, मुंबई-हावडा एक्सप्रेस, मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, मुंबई- हावडा दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई-लातूर एक्सप्रेस, मुंबई-हावडा मेल नागपूरमार्गे, मुंबई-हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे, मुंबई-अमृतसर एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान, सोमवार, 21 रोजी दादर येथून सुटणारी मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेस, तसेच रविवार, 20 रोजी नाशिक रोड येथून सुटणार्या गाड्यामध्ये मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
अप गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन
शुक्रवार, 18 रोजी दादर रेल्वे स्थानकावर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहे. त्यात लखनौ जंक्शन-मुंबई पुष्पक एक्सप्रेस, हावडा-मुंबई एक्सप्रेस, अमृतसर-मुंबई एक्सप्रेस, हावडा-मुंबई मेल नागपूर मार्गे, फिरोजपूर-मुंबई पंजाब मेल, हावडा-मुंबई मेल प्रयागराज छिवकी मार्गे तसेच शनिवार, 19 रोजी या दिवशी सुध्दा गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहे. या गाड्या मुंबईत जाणार नाही. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस, बिदर-मुंबई एक्स्प्रेस, अमृतसर-मुंबई एक्सप्रेस, लखनौ जंक्शन-मुंबई पुष्पक एक्सप्रेस, नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस, वाराणसी- मुंबई महानगरी एक्सप्रेस, हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेस, हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस यांचा समावेश आहे. शनिवार, 19 रोजी नागपूर मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी नाशिकरोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे.