युपीतील तरुणी भुसावळ रेल्वे स्थानकातून बेपत्ता


UP Girl Goes Missing From Bhusawal Railway Station भुसावळ : पटनाहून आईसोबत सुरत जाण्यासाठी निघालेली 19 वर्षीय तरुणी भुसावळ रेल्वे स्थानकावर बेपत्ता झाल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात तरुणी हरवल्याची नोंद करण्यात आली.

पहाटेच्या सुमारास तरुणी बेपत्ता
रोशनी शमी अहमद (19, मलोली गोसाईगंज, ता.मोहनलाल, जि.लखनऊ, उत्तरप्रदेश) ही तरुणी आपली आई सायरा बानो अहमदसोबत पटना येथून सुरत जाण्यासाठी 12 रोजी अप जनता एक्स्प्रेसने निघाली होती. भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक एकवर तरुणी झोपल्यानंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. सर्वत्र शोध घेवूनही तरुणी न आढळल्याने ती हरवल्याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसात नोंद करण्यात आली. उंची 160 सेंटीमीटर, रंगाने गोरी, सडपातळ, अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता, लाल रंगाचा पायजामा व पांढर्‍या रंगाचा दुपट्टा आहे. तरुणीबाबत कुणाला काहीएक माहिती असल्यास हवालदार आनंदा सरोदे (9823247299) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !