नागरीकत्व विधेयकासह विद्यार्थी मारहाणीचा काँग्रेस कमेटीतर्फे निषेध


प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर : पदाधिकार्‍यांची निदर्शने

भुसावळ : संसदेत नागरीक संशोधन विधेयक मंजूर करण्यात आल्याचा तसेच  नागरीकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणार्‍या पोलिस प्रशासनासह भाजपा सरकारचा भुसावळ तालुका काँग्रेस कमेटीने गुरूवारी निषेध करीत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. याप्रसंगी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना निवेदन देण्यात आले.

प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने
भाजपा प्रणित सरकारने नागरीकता कायदा सुधाकर विधेयक (सीएबी) करून भारतीय संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेने पार केलेले नागरीकत्व संशोधन विधेयक हे संविधान विरोधी असून भेदभाव पूर्ण आहे व संविधानाच्या मूल्यांविरूद्ध असून नागरीकत्व कायद्यामुळे नागरीकांच्या मनात भीती निर्माण झाली असून हा कायदा रद्द करण्याची मागणी करीत पदाधिकार्‍यांनी प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर माजी आमदार नीळकंठ फालक, योगेंद्रसिंग पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, भुसावळ तालुका काँग्रेसचे सरचिटणीस विवेक नरवाडे, मुन्वर खान, ईस्माईल गवळी, रहिम कुरेशी, ज्ञानेश्‍वर पाटील, नितीन पटाव, भगवान मेढे, अशाफाक काझी, ईम्रान खान, जयंत शूरपाटणे, विजय तुरकेले, सुदर्शन जाधव, रवी पाटील, अतुल चौधरी, राजू पालिमकर, जितू राणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


कॉपी करू नका.