चिमुकल्यांच्या कलागुणांना पालकांनी दिली दाद


भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन

भुसावळ : राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमध्ये 19 ते 21 दरम्यान तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून
गुरुवारी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन रश्मी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उद्योजक मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका सोफिया फ्रान्सिस, प्रवीण भराडीया, गोपाळ ठाकूर, डी.एम. पाटील उपस्थित होते. फॅन्सी ड्रेस, स्वागत गीत, सुगम संगीत स्पर्धा, जाहिरात सादरीकरण, सुविचार सादरीकरण यांसारख्या नाविण्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात रश्मी शर्मा म्हणाल्या की, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या सुप्त कलागुणांना वाव दिला पाहिजे. मनोरमा ओगले, गजाला शेख, दीपा पटेल यांनी परीक्षणाचे काम केले.


कॉपी करू नका.