होळहवेलीच्या तरुण शेतकर्‍याचा शॉक लागल्याने मृत्यू


जामनेर : शेतकर्‍याला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजता तालुक्यातील होळहवेली गावाजवळ घडली. या घटनेत सचिन भगवान चव्हाण (20) या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. सचिन चव्हाण हा शेतकरी गुरुवारी सकाळी 9 वाजता सुमारास  शेतात कपाशी व गहू पिकाला पाणी भरणा करण्यासाठी गेल्यानंतर इलेक्ट्रिक पंप सुरू करीत असताना पेटीत वीज प्रवाह उतरल्याने त्याचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.