भुसावळात सेना, भाजपा व राकाँतील इच्छुकांचे अर्ज दाखल

भुसावळातील प्रभाग क्रमांक 24 अ मध्ये पोटनिवडणुकीसाठी ऐन हिवाळ्यात पेटला राजकीय आखाडा ः शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल
भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 24 अ चे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी मुदतीआत जातप्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकार्यांनी त्यांना अपात्र ठरवले होते. नगरसेवक अपात्र झाल्याने या जागेसाठी प्रशासनाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. या अनुषंगाने गुरुवारी भाजपा, सेना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वतंत्ररीत्या शक्तीप्रदर्शन करीत प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व सेनेची महाविकास आघाडी असल्याने स्थानिक स्तरावरही हा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता होती मात्र ती फोल ठरली. दरम्यान, 9 जानेवारी रोजी प्रभाग 24 अ साठी निवडणूक होणार असून इच्छूकांनी मतदारांच्या भेटीगाठी वाढवल्याने भुसावळात ऐन हिवाळ्यात राजकीय आखाडा मात्र तापल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीने दुर्गेश ठाकूर यांना पुन्हा दिली संधी
जनआधार विकास पार्टीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी मुदतीआत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र होण्याची वेळ आली होती मात्र या जागेवर राष्ट्रवादीने पुन्हा दुर्गेश ठाकूर यांना संधी दिल्याने त्यांनी पदाधिकारी व प्रभागातील नागरीकांसमवेत गुरुवारी प्रांताधिकार्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रसंगी कृउबा सभापती सचिन चौधरी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, गटनेते उल्हास पगारे, उपगटनेते जाकिर सरदार, ईकबाल बागवान, आशिक खान शेरखान, सचिन पाटील, इम्तियाज शेख, प्रदीप देशमुख, राहुल बोरसे, संतोष दाढी चौधरी, अशोक (ऑँऊ) चौधरी यांच्यासह प्रभागातील नागरीक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खंडपीठात दिलासा मिळाल्याने उमेदवारी -दुर्गेश ठाकूर
जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात प्रकरण सादर करूनही वेळेत प्रमाणपत्र न मिळाल्याने अपात्र ठरलो होतो मात्र या प्रकरणी खंडपीठात दाद मागितल्यानंतर खंडपीठाने चार आठवड्यात जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश 11 डिसेंबर रोजी दिल्याने पुन्हा राष्ट्रवादीतर्फे प्रभागातून निवडणूक लढवत असल्याचे दुर्गेश ठाकूर यांनी सांगितले.
भाजपातर्फे रेखा सोनवणेंना उमेदवारी
प्रभाग 24 अ साठी भाजपाने रेखा सुनील सोनवणे यांना उमेदवारी दिली असून गुरुवारी त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रांताकडे अर्ज दाखल केला. आमदार संजय सावकारे यांच्या जामनेर रोडवरील कार्यालयात पदाधिकारी जमल्यानंतर शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज दाखल करण्यात आला. प्रसंगी भाजपा गटनेते मुन्ना तेली, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, अॅड.बोधराज चौधरी, पिंटू कोठारी, किरण कोलते, अमोल इंगळे, पवन बुंदेले, रमाशंकर दुबे, किशोर पाटील, शेख शफी पहेलवान, दिनेश नेमाडे, देवा वाणी, गिरीश महाजन, अनिरुद्ध कुलकर्णी, सुमित बर्हाटे, अर्जुन खरारे, राजू खरारे, वसंत पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेने विकी चव्हाण यांना दिली उमेदवारी
प्रभाग क्रमांक 24 अ च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने विकी रोहिदास चव्हाण यांनी उमेदवारी दिली असून गुरुवारी चव्हाण यांनीही पदाधिकार्यांसह अर्ज दाखल केला. प्रसंगी शहर प्रमुख बबलू बर्हाटे, श्याम श्रीगोंदेकर, पूनम बर्हाटे, भुराबाई चव्हाण, प्रतिभा दुसाने, अजय चव्हाण, मंगेश चव्हाण, राहुल चव्हाण, शुभम कुळकर्णी, देवेंद्र पाटील, मनोज पवार, शेख मेहमूद, निलेश वानखेडे, नबी पटेल, नामदेव बर्हाटे, दिनेश बुंदेले, अजय चव्हाण, अनिता पवार, शोभा भोई, हिराबाई पाटील, पुष्पा खरे, कल्पना बुंदेले, लक्ष्मी खरे, जंगलू चव्हाण व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
9 रोजी मतदान व 10 रोजी निकाल
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरूंदकर यांनी निवडणूक कार्यक्रम आखून दिला असून 16 ते 20 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 21 रोजी उमेदवारी अर्जाची छाननी तर अपिल असल्यास 30 डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय देता येणार आहे. 9 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच दरम्यान मतदान होणार असून 10 रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.


