मद्यपी मुलापुढे आईने टेकले हात : २५ हजारांची सुपारी देत घडवली हत्या : धुळे गुन्हे शाखेकडून दोघांना- बेड्या


Mother lays her hands in front of drunken son: 25,000 betel nut murder committed: Dhule Crime Branch handcuffs two धुळे : मद्यपी मुलापुढे आईने हात टेकल्यानंतर २५ हजार रुपयात सुपारी देण्यात आली व किलरने कामदेखील बजावले मात्र धुळे गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा उलगडा केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी मयताची आई लता विश्वास भामरे व पुंडलिक गिरधर भामरे (रा.मेहेरगाव) यास अटक करण्यात आली असून अन्य दोन संशयीतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

गळा आवळून केला खून
मेहेरगाव येथील अमोल विश्वास भामरे (३८) या तरुणाचा नुकताच खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी सोनगीर पोलिसात मयताचे वडील विश्वास दामू भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. समांतर तपासादरम्यान धुळे गुन्हे शाखेने पुंडलिक गिरधर भामरे या संशयीतास ताब्यात घेतले. संशयीताने आपल्या दोन साथीदारांसोबत गळा आवळून अमोलचा खून केल्याची कबुली दिली आहे.

आईनेच दिली होती सुपारी
मयत अमोल याला दारूचे व्यसन असल्याने त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची आई लता यांनी संशयीत आरोपींना २५ हजारात सुपारी दिली होती. १, डिसेंबर रोजी नवलाणे गावच्या शिवारातील इंग्लीश मेडियच्या स्कूलच्या आवारात अमोल यास संशयीतांनी दारू पिण्याच्या निमित्ताने त्याचा गळा आवळून खून केला होता. दरम्यान, अमोल भामरे हा काहीएक काम धंदा करीत नव्हता तसेच आई-वडील आणि पत्नीशी सतत भांडण करीत असल्याने तसेच दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करीत असल्याने या सततच्या त्रासाला कंटाळून आई लता विश्वास भामरे हिने मुलगा अमोलला मारण्याची सुपारी पुंडलिक भामरे याला दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !