नाहाटा महाविद्यालयात 23 रोजी संगणकशास्त्र विषयावर राष्ट्रीय परिषद

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात एक दिवसीय संगणकशास्त्र या विषयावर राष्ट्रीय परीषद सोमवार, 23 डिसेंबर रोजी होत आहे. या परीषदेत नेटवर्क आणि सेक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरींग, डाटा, मिनींग, कॉम्प्युटर ग्रॉफीक्स बिग डाटा, इंटरनेट सिस्टिम, क्लाऊड कॉम्प्युटींग, मोबाईल कॉम्प्युटींग, रोबोटिक्स, ई-कॉमर्स, वेब टेक्नॉलॉजी अशा विविध विषयावर अभ्यास केला जाणार आहे. या परीषदेचे उद्घाटन 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी रजिस्टार डॉ.बी.व्ही.पवार यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक असतील. प्रमुख पाहुणे म्हणून चेअरमन महेश फालक, सचिव विष्णु चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांची उपस्थिती राहणार आहे.
चार सत्रात विविध कार्यक्रम
द्वितीय सत्रातडाटा इंजिनिअरींग अॅण्ड अॅनलिसीस विभागप्रमुख संजय झोपे यांचे डाटा इंजिनिअरींग या विषयावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने व्याख्यान होईल. यानंतर तृतीय सत्रात स्कूल ऑफ कॉम्प्युटर सायन्स एमआयटी वर्ल्डपीस विद्यापीठ, पुणे विभागप्रमुख डॉ.चंद्रकांत पाटील यांचे ‘संगणकशास्त्र एक योगदान’ या विषयावर व्याख्यान होईल. चतुर्थ सत्रात या परीषदेच्या समारोप समारंभाप्रसंगी समारोपकर्ते म्हणून प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे यांची तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील यांची आणि प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.जी.आर.वाणी यांची असेल. या परीषदेचे संयोजक उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे हे असून आयोजन सचिव प्रा.हर्षल पाटील तर विद्यार्थी सचिव म्हणून अपूर्वा बर्हाटे आणि मेघा चौधरी हे आहेत. या परीषदेसाठी विविध समित्या गठीत झाल्या असून प्रत्येक समिती आपापली कामे पाहत आहे. या परिषदेसाठी संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या राज्यातील जवळपास 258 संशोधक उपस्थित राहणार आहेत तर सुमारे 115 शोधनिबंधांचे वाचन परिषदेत केले जाणार आहे. शोधनिबंध गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक अशा विविध राज्यातून येणार आहे.
यांचे परीषद यशस्वीतेसाठी परीश्रम
परीषद यशस्वीतेसाठी डॉ.मोहन फालक, महेश फालक, विष्णू चौधरी, संजय नाहाटा, डॉ.मीनाक्षी वायकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.बी.एच.बर्हाटे, डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.एन.ई.भंगाळे, कबचौ उमवि सिनेट सदस्य प्रा.ई.जी.नेहेते, प्रा.डॉ.जी.आर.वाणी, डॉ.गौरी पाटील, प्रा.स्वाती फालक, आशिष चौधरी, डॉ.सचिन येवले, डॉ.व्ही.एन.महिरे, डॉ.उमेश फेगडे, प्रा.ए.पी.नवघरे, डॉ.एस.पी.झनके,डॉ.रश्मी शर्मा, डॉ.विद्या पाटील, डॉ.मनोज जाधव, प्रा.हर्षल पाटील, प्रा.वैशाली पाटील, प्रा.शंकर पाटील परीश्रम घेत आहेत.


