जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंचांसह सदस्यांनी ठोकले टाळे


बोदवड : तालुक्यातील जामठी येथील ग्रामपंचायत कार्यालयाला उपसरपंच व सदस्यांनी यांनी शनिवारी टाळे ठोकल्याने गावात मोठी खळबळ उडाली.
ग्रामसेवक जी.एच.राठोड सातत्याने दांडी मारत असल्याने तसेच गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत कारभारच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करीत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

ग्रामसेवकाच्या मनमानीला ग्रामस्थ कंटाळले
गेल्या काही दिवसांपासून येथे कार्यरत असलेले ग्रामसेवक राठोड हे ग्रामपंचायत कार्यालयरत येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांना शासकीय कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटकंती करावी लागत असून ग्रामसेवक गेल्या एक महिन्यापासून ग्रामपंचायत कार्यालयात आलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून मासिक मिटींग घेण्यात आली नसतांनाही खर्च मात्र वारेमाप होत असून गेल्या एक वर्षापासून या ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप आहे. तेरीज पत्रक संशयास्पद असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे या सर्व कारभाराची सखोल चौकशी होईपर्यंत आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला जाहीररीत्या टाळे लावत असल्याचे उभय पदाधिकार्‍यांनी जामठी ग्रामपंचायत कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.दिलेल्या निवेदनावर येथील ग्रामपंचायत उपसरपंच देविदास कडू पाटील, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर महाजन, पत्रकार विकास नारायण पाटील यांच्या सह्या आहेत.


कॉपी करू नका.