CBI arrests Videocon group chairman Venugopal Dhoot in ICICI bank fraud case व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणूगोपाल धूत अखेर सीबीआय जाळ्यात
CBI arrests Videocon group chairman Venugopal Dhoot in ICICI bank fraud Case नवी दिल्ली : आयसीआयसीआय कर्ज प्रकरणी व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. सीबीआय तपास यंत्रणेशी संबंधित लोकांनी याबाबत माहिती दिली असून यापूर्वी आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना यापूर्वीच अटक केली आहे. ते सध्या तीन दिवसांच्या सीबीआय कोठडीत आहेत.
मुंबईतून केली अटक
71 वर्षीय धूत यांना सोमवारी मुंबईतून अटक करण्यात आली. आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला अटक केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना अटक करण्यात आली. बँकेच्या माजी सीईओ आणि एम.डी.चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे संस्थापक वेणुगोपाल धूत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत 2019 मध्ये नोंदवलेल्या बँक कर्ज प्रकरणात आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्यांच्याशिवाय दीपक कोचर संचालित न्यूपॉवर रिन्यूएबल्, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. आयसीआयसीआय बँकेने बँकिंग नियमन कायदा, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघण करून वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुप ऑफ कंपन्यांना 3,250 कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा दिल्याचा सीबीआयचा आरोप आहे.



