सोने दराने घेतली उसळी ; प्रति तोळा 38 हजार 470 रुपयांवर पोहोचले भाव
मुंबई : सोने दरात तब्बल 20 टक्के वाढ झाली असून वर्षाअखेरीस सोने 10 ग्रॅमचा दर 40 हजार रुपयांचा टप्पा पूर्ण करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीमध्ये सोनेदर प्रति ग्रॅम 31 हजार 400 रुपये असताना आज हे दर 38 हजार 470 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले आहेत. सोमवारी 24 कॅरेटचा भाव 38 हजार 470 रुपये होता. दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण होताना सोने आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आल्याने सोने महागले आहे. भारत सोने आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेनुसार सोने दर निश्चित होतात. त्यामुळे सोने दरवाढ सातत्याने होताना दिसत आहे. सण, उत्सव याकाळात सोने खरेदीला प्राधान्य मिळत आहेत. तसेच विवाहांचे मुहूर्त या काळात सोन्याची मागणी अधिक असते. त्यामुळे आगामी काळात सोने आणखी महाग होत जाईल, असे सराफा व्यापार्यांचे म्हणणे आहे.