नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या कालावधीत वाढ


Increase in duration of Nagpur-Margaon bi-weekly special train भुसावळ : रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशंना सुविधा मिळावी, गाडीत जागा मिळावी यासाठी नागपूर-मडगाव या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला 25 फेब्रुवारी 2023 पर्यंत चालविण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष करून गोव्याला जाणार्‍यांची संख्या अधिक असल्याने नागपूर-मडगाव ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी 31 डिसेंबर 2022 पर्यंतत चालविली जाणार होती मात्र रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून या गाडीला 25 फेब्रुवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवाशांना सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर-मडगाव (01139) या गाडीचा कालावधी वाढवण्यात आला असून मडगाव-नागपूर (01140) ही द्वि साप्ताहिक गाडी 1 जानेवारी 2023 पर्यंत होती, यात वाढ करून ही गाडी आता 26 मार्च 2023 पर्यत चालविली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. प्रवाशांनी या गाड्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे केले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !