Former Home Minister Anil Deshmukh finally out of jail माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर तुरुंगाबाहेर
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर 13 महिने 26 दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी देशमुख कारागृहाबाहेर येताच त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. 100 कोटी वसुली प्रकरणात देशमखु यांना अटक करण्यात आली होती मात्र अलिकडेच त्यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला होता.
जामिनाची प्रत मिळताच देशमुख आले बाहेर
देशमुख यांच्या जामिनावरील स्थगिती आणखी वाढविण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली हव बुधवारी देशमुखांचा जामिनावर सुटण्याचा मार्ग मोकळा झाला. अनिल देशमुख यांच्या जामिनाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर दुपारी पाच वाजता अनिल देशमुख कारागृहा बाहेर आले.




दिग्गज नेत्यांनी लावली हजेरी
अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आज राष्ट्रवादीचे पाच दिग्गज नेते उपस्थित होते. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील कारागृहाबाहेर उपस्थित होते. अनिल देशमुख यांचं हार घालून स्वागत करण्यात आलं. तर कार्यकर्त्यांनी देशमुख यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला.