पुण्यात दोन कोटींचा बनावट मद्यसाठा जप्त


Fake liquor stock worth two crore seized in Pune पुणे : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सरसावली असून विविध ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन सुरू असतानाच पुण्यात मात्र मोठ्या प्रमाणावर बनावट दारू विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन कोटींचा बनावट मद्यसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. यातील आरोपींवर यापूर्वीही अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दोन ट्रकमधून ही दारू गोव्यातून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात होती शिवाय पोलिसांना संशय येऊ नये यासाठी या दोन्ही ट्रकमध्ये डांबराच्या गोळ्या पसरवण्यात होत्या मात्र पथकाने कारवाई करीत आरोपींच्या मुसक्या बांधल्या. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !