मोठी कारवाई ! : 28 वर्षांपूर्वी झालेल्या आईसह चौघा मुलांच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक
Big action! : Accused arrested in connection with murder of four children including mother which happened 28 years ago मुंंबई : तब्बल 28 वर्षानंतर आईसह चौघा मुलांच्या हत्येप्रकरणी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले आहे. साहबलाल अमरनाथ चौहाण, ऊर्फ काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार (43, रा. गांव नोनौटी, पो.बिरापट्टी, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर अन्य दोन आरोपींचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
1994 मध्ये घडले होते हत्याकांड
काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील पेणकरपाडा भागातल्या भारवाड चाळ मध्ये 16 नोव्हेम्बर 1994 रोजी हे हत्याकांड घडले होते. या घटनेत आईसह तिच्या चार मुलांच्या हत्या करण्यात आली होती मात्र 28 वर्षानंतरही आरोपी यंत्रणेला गवसत नव्हते.




अन्य दोघांचा कसून शोध सुरू
मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने 1994 साली आई व तिच्या 4 लहान मुलांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी 28 वर्षांनी साहबलाल अमरनाथ चौहाण, ऊर्फ काल्या ऊर्फ साहेब ऊर्फ राजकुमार (43, रा. गांव नोनौटी, पो.बिरापट्टी, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश) यास अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे.