आठ लाखांची लाच मागणी भोवली : धुळे जात पडताळणी समितीच्या कनिष्ठ लिपिकासह तिघांविरोधात गुन्हा


A bribe of eight lakhs was demanded : A case was registered against three persons including a junior clerk of the Dhule Caste Verification Committee जळगाव : अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी आठ लाखांची मागणी करणार्‍या अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीच्या कनिष्ठ लिपिकांसह तिघांविरोधात जळगाव एसीबीने गुन्हा दाखल केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
धुळे अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक अनिल पाटील (52), अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालयातील समिती सदस्य निलेश अहिरे (52) व नाशिक जिल्हा परीषद कार्यालयातील आरोग्य विभागाचे कनिष्ठ लिपिक राजेश ठाकुर (52) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयीतांची नावे आहेत. दरम्यान, हा गुन्हा अधिक तपासार्थ नाशिक एसीबीकडे वर्ग करण्यात आला आहे.

लाच मागणीचा अहवाल आल्याने गुन्हा
फैजपूर येथील 52 वर्षीय तक्रारदार हे अनुसूचीत जमाती (एस.टी.) प्रवर्गातील आहेत. ून त्यांनी स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी प्रकरण सादर केलेले होते. मागील 19 वर्षापासून वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करून देखील तक्रारदार यांना त्यांचे स्वतःचे व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला. न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे येथे जमा केल्यानंरही सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील लिपिक अनिल पाटील यांना भेटले व त्यांना दुसर्‍या दिवशी बोलावून घेवून तक्रारदार यांचे व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरचे नावे सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे दहा लाखांची मागणी करण्यात आली तसेच निलेश अहिरे यांनी राजेश ठाकूर यांना मध्यस्थी टाकत तक्रारदाराकडे 28 ऑक्टोंबर 2022 व 21 नोव्हेंबर 2022 रोजी तडजोडीअंती आठ लाखांची मागणी केली तसेच जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी नंदुरबार कार्यालयातील लिपिक खोसे यांना हजार दोन हजार रुपये देण्याबाबत तक्रारदार यांना प्रोत्साहन दिले. लाचेचा संशय आल्यानंतर आरोपींनी लाच स्वीकारली नसलीतरी लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर धुळे शहर पोलिसात शुक्रवारी रात्री तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, रवी घुगे, अशोक अहिरे, बाळु मराठे, सुनील वानखेडे, ईश्वर धनगर, प्रणेश ठाकूर आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !