Deven Bharti appointed special police commissioner of Mumbai गृहमंत्र्यांचे मोठे गिप्ट : मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी देवेन भारती
Deven Bharti appointed special police commissioner of Mumbai मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य अत्यंत विश्वासू व जवळचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करून फडणवीसांनी त्यांना मोठा गिप्टचे दिले आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त अशा प्रकारच्या पदाची निर्मिती केली आहे.
विविध पदांवर केले काम
भारती यांनी यापूर्वी मुंबईत जॉइंट कमिश्नर (कायदा व सुव्यवस्था), जॉइंट कमिश्नर (आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू), अतिरिक्त पोलिस आयुक्त (क्राइम ब्रँच) या जबाबदार्या सांभाळल्या आहेत. शिवाय त्यांनी दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) नेतृत्वही केले आहे. महाविकास आघाडी सरकारने देवेन भारती यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी दिली होती. गेल्या 13 डिसेंबर रोजी भारती यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून भारती हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे.



