महिलांनी पत्रकारीतेत आवर्जून यावे : संपादीका शांता वाणी
भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त भूमिपूत्र पत्रकारांचा सन्मान
Women should enter journalism : Editor Shanta Wani भुसावळ : बदलत्या काळात महिलांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आवर्जून यावे व आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार शांता वाणी यांनी केले. शांता वाणी यांनी पन्नास वर्षांपूर्वी भुसावळ शहरात पत्रकारीता सुरू केली. त्याविषयी त्या म्हणाल्या की, मी त्यावेळी एकमेव महिला पत्रकार होते. मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभांचे वृत्तसंकलनासाठी जावे लागे त्यावेळी पती व सासरच्या मंडळींनी घर सांभाळून मला मोठी साथ दिली. पत्रकारीतेत अनेक संकटे आली पण मी डगमगता काम करीत राहिले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संपर्कात येणे पत्रकारीतेमुळे शक्य झाले. आज या क्षेत्रात महिला आहेत पण ही संख्या वाढली पाहिजे, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
पत्रपंडित बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे सहा जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. भुसावळ शहर पत्रकार संस्थेतर्फे शुक्रवार, 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वेच्या श्री कृष्णचंद्र सभागृहात सायंकाळी आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, शांता वाणी, कमलाकर वाणी, संस्थापक अध्यक्ष तथा सरकारी वकिल नितीन खरे, श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, अध्यक्ष प्रेम परदेशी, प्रकल्प प्रमुख उज्ज्वला बागुल, सचिव हबीब चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी पत्रपंडित बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस डीवायएसपी वाघचौरे व मान्यवरांचे हस्ते माल्यार्पण व दीपप्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शहर पत्रकार संस्थेतर्फे स्वागत सन्मान करण्यात आले.
निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
दर्पणकार जांभेकर स्मृतीनिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच शहरातील मूळ रहिवासी असलेल्या मात्र पत्रकारीतेच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायीक झालेल्या निवडक भूमिपूत्रांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नागरीक व महाविद्यालयीन विद्यार्थी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात स्पर्धेचे विषय बदलत्या काळातील पत्रकारांची भूमिका, पत्रकारितेतील नवे आयाम, प्रिंट मिडिया, ईलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया यांची विश्वासार्हता, मला आवडलेली बातमी यामध्ये जेष्ठ नागरीक गटात प्रथम क्रमांक संध्या कमलाकर भंगाळे, द्वितीय विलास मल्हारी बेंद्रे तर तृतीय प्र.ह.दलाल सर तर महाविद्यालयीन गटात प्रथम चेतना विश्वनाथ पाटील, द्वितीय पायल अनिल सुरवाडे व तृतीय क्रमांक निकिता विनोद सुरवाडे यांनी पटकाविला. विजेत्यांना समारंभपूर्वक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र ,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देण्यात आले. इतर सहभागी स्पर्धकाना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात येवून सन्मानित केले.
पत्रकार दिनानिमित्त भुमिपूत्रांचा सन्मान
शहर पत्रकार संस्थेतर्फे भुसावळ शहरातील मूळ रहिवासी असलेल्या मात्र पत्रकारीतेच्या निमित्ताने बाहेरगावी स्थायीक झालेले भूमिपूत्र, लोकशाहीच्या पत्रकार शांता वाणी, सुरेश उज्जैनवाल, नरेंद्र कदम, महेश मांडे, ललित खरे, शेखर पाटील, सुश्रृत जळुकर, मंदार देशपांडे या भूमिपुत्रांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर श्रीकांत जोशी यांनी पत्रकार क्षेत्रात 35 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. मानपत्राचे वाचन डॉ.जगदीश पाटील यांनी केले. दरम्यान डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सुरेश उज्जैनवाल, शांता वाणी यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन प्रा.राजश्री देशमुख व तुषार वाघुळदे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी प्रस्ताविक केले तर प्रकल्पप्रमुख उज्वला बागुल यांनी आभार मानले.
प्रसंगी विविध क्षेत्रातील व सामाजिक संघटना यांचे
मान्यवर यांनी पत्रकार बांधव व भागिनींचे सत्कार केला. कार्यक्रमास हबीब चव्हाण , हेमंत जोशी , श्रीकांत सराफ , गणेश वाघ , वासेफ़ पटेल , आशिष पाटिल ,निलेश फिरके ,सलाहुद्दीन आदी, दिपक चंदवानी, राजू चौधरीं , सतिष कांबळे , संतोष शेलोडे ,सुनील आराक , अभिजीत आढाव, कमलेश चौधरीं , कलीम पायलट, विनोद गोरधे , राजेश तायडे , वसंत कोलते , संजय काशिव , अनिल सोनवणे , केलास उपाध्याय , गोपी म्यांद्रे , नाना पाटिल , सद्दाम खाटीक , कालू शहा, इकबाल खान, जगदीश पाटिल , यांचेसह प्रिंट मीडिया , इलेट्रॉनिक मीडियाचे मान्यवर पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .