अल्पवयीन तरुणीवर तिघांचा सामूहिक अत्याचार
Gang rape of minor girl by three नवी दिल्ली : राजस्थानच्या जयपूर येथील दौसा परीसरातील तीन तरुणांनी अल्पवयीन मुलीला अपहरण करीत तिच्यावर सामुहिक बालात्कार केला तसेच व्हिडिओ बनवून धमकी दिली. या नंतर पीडितेने पोलिसांजवळ या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण करीत केला अत्याचार
पीडिता तरुणी शनिवारी संध्याकाळी तिच्या मावशीसोबत पोलीस ठाण्यात आली आणि तिने तक्रार नोंदवली. पीडितेने तीन नामांकित तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ’भेडाडी येथील रहिवासी शेबू, सुमेर आणि गोविंद मीना यांनी 2 जानेवारी रोजी तिचे अपहरण केले. नंतर तिच्यासोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली. घटनेदरम्यान आरोपीने व्हिडिओ बनवला होता. नंतर तो व्हायरल करण्याची धमकी देऊन परत तेथेच सोडून दिले, असं एफआयरमध्ये म्हटले आहे.



