नाशिक-शिर्डी महामार्गावर भीषण अपघातात दहा भाविक ठार : मुख्यमंत्र्यांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश
Fatal accident involving a Sai devotee’s bus on the Nashik-Shirdi highway : Ten devotees killed नाशिक : नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दहा साईभक्त ठार तर 34 भाविक जखमी झाले असून मुखमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत तर मृताच्या वारसांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर शासकीय खर्चाने उपचाराचे आदेश देण्यात आले आहेत. अंबरनाथ ठाणे परीसरातील सुमारे 50 प्रवासी बसमधून शिर्डीकडे प्रवास करण्यासाठी निघाल्यानंतर निमआराम बस व ट्रकमध्ये शुक्रवारी पहाटे वावी-पाथरे गावाजवळ अपघात घडली.
साखर झोपेत प्रवासी असताना अपघात
शिर्डी महामार्गावर वावी-पाथरे दरम्यान शुक्रवारी सहा वाजेच्या सुमारास गाईड कंपनीची खासगी आराम बस (क्र. एम.एच. 04 एफ.के.2751) व ट्रकमध्ये धडक झाली. अपघातग्रस्त बसमधील सुमारे 50 प्रवासी शिर्डीच्या साई दर्शनासाठी निघाल्यानंतर संकट कोसळले. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.




अपघाताच्या चौकशीचे आदेश
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.