दहिगावच्या तरुणानेच केली गावातल औषध दुकानात चोरी : पोलिसांनी सीसीटीद्वारे आवळल्या मुसक्या

The youth of Dahigaon committed the theft in the village drug shop : Police caught through CCT यावल : तालुक्यातील दहिगाव येथील औषधीच्या दुकानातील चोरी प्रकरणी गावातील एका 32 वर्षीय तरूणास पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही पुटेजच्या आधारे या तरुणावर संशय बळावला होता तर त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला 27 जानेवारी पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
16 हजारांचा मुद्देमाल लांबवला
दहिगाव येथे न्यू परीमल मेडिकल स्टोअर्स हे औषधीचे दुकान आहे. या दुकानाचे शटर्स वाकवून अज्ञात चोरट्याने 16 हजारांचा मुद्देमाल चोरी केला होता. दुकान मालक महेंद्र रामचंद्र सोनवणे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिसांनी विविध भागातील सीसीटीव्ही पुटेज तपासले असता त्यांना नितीन जनार्दन पाटील (32, रा. दहिगाव) या तरूणावर संशय बळावला तेव्हा पोलिसांनी त्यास अटक केली व त्याला येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.एम.एस.बनचरे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता त्याला 27 जानेवारी पर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांमार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.


