भुसावळात महिलेचा विनयभंग करीत मारहाण : एकाविरोधात गुन्हा


Woman molested and beaten in Bhusawal : Crime against one भुसावळ : शहरातील रामदास नगरातील 30 वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून संशयीत रफिक गवळी (नाव, गाव माहित नाही) विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
30 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार आरोपींकडे गुरे-ढोरे ही पीडीत महिलेकडील गायीचा चारा खावून घाण करीत असल्याने त्याबाबत महिलेने तक्रार केल्यानंतर आरोपीने लाकडी काठीने महिलेच्या मांडीवर मारहाण करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले शिवाय सासरे व नणंद यांनादेखील शिविगाळ केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरू नरफिक गवळी (नाव, गाव माहित नाही) विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !