धुळ्यातील युवा नेत्याचा पिस्टलाच्या धाकावर ईगतपुरीच्या तरुणीवर बलात्कार

भिवंडी पोलिसांनी धुळ्यातून तरुणाला केली अटक : न्यायालयाने सुनावली 7 पर्यंत पोलीस कोठडी


Young leader of Dhula rapes Eigatpuri girl at pistol point धुळे : ईगतपुरीतील युवतीवर पिस्टलाच्या धाकावर अत्याचार केल्याप्रकरणी धुळ्यातील कपिल वाल्मीक दामोदर (गौतम नगर, धुळे) यास शुक्रवारी भिवंडी पोलिसांनी धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. संशयीताला न्यायालयात हजर केले असता 7 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हॉटेलमध्ये नेत केला अत्याचार
नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी येथील 31 वर्षीय पीडीतेने कोनगाव (भिवंडी) पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नाचे आमिष दाखवून तिला भिवंडी येथील हॉटेल ग्रीन कॉन्टी टाऊन हाऊसमध्ये नेण्यात आले व पिस्टलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला तसेच शारीरीक संबंधाचे फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. अत्याचाराचा हा प्रकार 1 नोव्हेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान घडला. पीडित तरुणीने कोनगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर कपिल वाल्मीक दामोदर विरोधात दाखल करण्यात आला व शुक्रवारी संशयीताला अटक करण्यात आली. ही कारवाई एसीपी किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक डी.पी.नागरे, महिला पोलीस उपनिरीक्षक ए.डी.घाटगे यांच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !