धुळे महापौरपदी प्रतिभा चौधरी बिनविरोध : निवडीची केवळ औपचारीकता बाकी
धुळे : धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी प्रतिभा चौधरी यांनी शनिवारी अर्ज दाखल केला. त्यांचा केवळ अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध होणार असून निवडीची केवळ आता औपचाारीक घोषणा बाकी आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सारीका अग्रवाल तर स्थायी समिती निवडणुकीतही भाजपाच्या किरम कुलेवार यांची बिनविरोध निवड निश्चित असून या जागांसाठी देखील या उमेदवारांव्यतिरीक्त एकही अर्ज दाखल नसल्याने त्याबाबतही केवळ निवडीची औपचारीक घोषणा बाकी आहे.
राष्ट्रवादीचा दावा ठरला फोल
महापौर निवड बिनविरोध होऊ देणार नाही, असे सांगणार्या राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांचा दावा पोल ठरला. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत धुळे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. 8 फेब्रुवारी रोजी बिनविरोध निवडीची केवळ अधिकृत घोषणाच शिल्लक राहिली आहे. भाजपातर्फे प्रतिभा चौधरी यांनी दोन अर्ज दाखल केले. तर स्थायी समिती सभापतीपदी किरण राकेश कुलेवार, बालकल्याण महिला बालकल्याण सभापतीपदी सारिका प्रवीण अग्रवाल आणि उपसभापतिपदी विमलबाई गोपीचंद पाटील यांचे एक-एक अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे उपस्थित होते.


