शरद पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी : फडणवीसांच्या गौप्यस्फोटामुळे राज्यात खळबळ


Early morning swearing-in ceremony after discussing with Sharad Pawar : Excitement in the state due to Fadnavis’ secret explosion मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात हादरा बसणारा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाल्याचा त्यांनी दावा करीत आता नवीन वादाला तोंड फोडले आहे. मंगळवारपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत असताना त्याबाबत जुना व्हिडीओ समोर आला आहे.

पहाटेचा शपथविधी पुन्हा चर्चेत
भाजपसोबत 2019 ला सत्तास्थापन करताना अजित पवार यांनी काही आमदारांच्या साथीने सत्ता स्थापन करून राज्यपालांच्या उपस्थितीत विधानभवनात शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची, तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आजही या मुद्यावरून अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले जात आहे.





काय आहे गौप्यस्फोट?
फडणवीसांनी म्हणाले की, ”आम्ही निवडून आल्यानंतर आमची शिवसेनेशी बोलणी सुरू होती. तेव्हा ते काँग्रेस आणि एनसीपीसोबत सत्तास्थापन करण्यासाठी चर्चा करीत असल्याचे समजले. त्यामुळे आम्ही वेगळा पर्याय निवडण्याचे ठरवले. आम्ही काँग्रेससोबत जावू शकत नव्हतो. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आम्ही चर्चा केली. त्यावेळीही प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आला होता.

जयंत पाटलांचे ते वक्तव्य पुन्हा चर्चेत
काही दिवसांपूर्वी पहाटेच्या शपथविधीबद्दल जयंत पाटील म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा 3 वर्षांपूर्वी राजभवनात पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता. ही शरद पवारांची खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. शपथविधीची ही खेळी ही कुणीतरी जाणिवपूर्वक खेळली असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट मागे घेण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आणखी मजबूत झाली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !