धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शिरपूर तालुक्यात सात लाखांचा गांजा केला जप्त


Ganja worth seven lakh seized in Shirpur taluka : A case Against One धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या शेत-शिवारात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून सात लाख आठ हजार 60 रुपये किंमतीचा 236 किलो गांजाची झाडे जप्त केली. सोमवारर, 13 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवी कालुसिंग पाडवी (लाकड्या हनुमान, ता.शिरपूर) याच्याविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तूर-हरभरा पिकात फुलवली गांजा शेती
शिरपूर तालुक्यात यापूर्वीदेखील अनेकदा गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली आहे मात्र शॉर्टकट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जण गांजा शेतीच्या आहारी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित रवी पाडवी याने तूर, हरभरा व कापूस या पिकांच्या मध्यभागी गांजा पिकाची शेती केल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले होते. पाडवी याने प्रतिबंधीत गांज्याचे अंदाजे 3 ते 5 फूट कमी-अधिक उंचीचे एकुण 285 झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. या गांजाचे बाजारमूल्य सात लाख आठ हजार 60 रुपये असून 236 किलो 20 ग्रॅम वजनाचा गांजासदृश्य अंमली पदार्थाचे ओले झाड जप्त करण्यात आले.
आरोपीविरोधात महेंद्र देवराम सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सहा.निरीक्षक सुरेश शिरसाट, बाळासाहेब सूर्यवंशी, संदीप पाटील, संदीप सरग, सुरेश भालेराव, महेंद्र सपकाळ, जगदीश सुर्यवंशी, विनोद पाठक, योगेश साळवे, योगेश ठाकुर, कैलास महाजन, संदीप ठाकरे, योगेश मोरे, संजय भोई, कृष्णा पावरा, रोहिदास पावरा, इसरार फारुखी, संतोष पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !