कासारखेडा महिला सरपंचांचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू


Kasarkheda female sarpanch died due to dizziness यावल  : तालुक्यातील कासारखेडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच घरी असतांना अचानक त्यांना चक्कर आल्याने ओट्यावरून पडताच त्यांचा मृत्यू झाला. बुधवार, 22 रोजी ही घटना घडली. नजीया मुराद तडवी (56) असे मयत सरपंचांचे नाव आहे.

हृदयविकाराने मृत्यूचा अंदाज
नऊ महिन्यापूर्वी झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत नजीया या निवडून आल्या होत्या मात्र सरपंच नजीया मुराद तडवी या बुधवारी घरी असतांना त्यांना अचानक चक्कर आले व त्या ओट्यावरून जमिनीवर कोसळल्या. या घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना आरोग्य केंद्रात नेले व तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मृत घोषीत केले. त्यांचा मृत्यू ह्रदय विकाराने झाला असावा, असा अंदाज आहे. निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परीवार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !