शिरपूर पोलिसांनी रोखली शस्त्र तस्करी : 12 तलवारींसह धुळ्यातील आरोपी जाळ्यात

चारचाकी वाहनही जप्त : गुप्ती, चॉपर, चाकूसह सहा लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त


Shirpur police busted arms smuggling : Accused in Dhule with 12 swords धुळे : शिरपूर तालुका पोलिसांनी मोठा घातपात होण्यापूर्वीच शस्त्रास्त्रांची तस्करी रोखली असून धुळ्यासह तालुक्यातील दहा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्टवर गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 12 तलवार, दोन गुप्तीसह चॉपर, बटन चाकू, फायटर व चारचाकीसह सहा लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत दिली. शिरपूर तालुका पोलिसांच्या धाडसी कारवाईबद्दल पथकाला दहा हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना इंदौरहून धुळ्याकडे होणार्‍या शस्त्र तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर हाडाखेड चेकपोस्टवर सापळा रचण्यात आला. गुरुवारी दुपारी तीन वाजता इर्टीगा (क्र.एम.एच. 04 एफ.झेड. 2004) आल्यानंतर तिची तपासणी केली असता त्यात 12 तलवार, दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनचा चाकू, दोन फायटर आढळल्याने हे शस्त्र जप्त करण्यात आले तसेच वाहनातील दहा आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी हे धुळ्यासह तालुक्यातील जुन्नर व लळींग गावातील रहिवासी आहेत.

या आरोपींना केली अटक
अटकेतील आरोपींमध्ये सतपाल गिरधर सोनवणे (25, रा.लळींग), किरण नंदलाल दुधेकर-मराठे (27, रा.जुन्नर), विकास देवा ठाकरे (40, रा.लळींग), सखाराम रामा पवार (45, रा.लळींग), सचिन राजेंद्र सोनवणे (28, रा.अवधान), राजू अशोक पवार (26, रा.जुन्नेर), अमोल शांंताराम चव्हाण (20, रा.जुन्नेर), , संतोष नामदेव पाटील (22, रा.जुन्नेर), विशाल विजय ठाकरे (27, रा.लळींग), विठ्ठल हरबा सोनवणे (48, रा.लळींग) यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात भारतीय हत्त्यार कायदा कलम 4/25 सह मुंंबई पोलिस कायदा कलम 37 (1) (3) चे उल्लंघण 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, प्रभारी उपअधीक्षक अंन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक सुरेश शिरसाठ, हवालदार जाकीरोद्दीन नसीरोद्दीन शेख, चत्तरसिंग लखा खसावद, पवन रामचंद्र गवळी, संजय काशीनाथ सूर्यवंशी, आरीफ रमजान पठाण, संदीप चंद्रकांत शिंदे, रोहिदास संतोष पावरा, योगेश बाळकृष्ण मोरे, चालक संतोष शिवाजी पाटील, चालक इसरार जकाउल्ला फारुकी यांच्या पथकाने केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !