जळगावातील तीन कुविख्यात गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार


Three notorious criminals in Jalgaon deported from the district जळगाव : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशाल मुरलीधर धाबाडे (21), उदय रमेश मोची (19), अभिषेक उर्फ बजरंग ’परशुराम जाधव (19, सर्व रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

विविध प्रकारचे गुन्हे दाखल
तीनही संशयीतांविरोधात जळगाव शहरातील विविध पोलिस ठाण्यात शरीराला ईजा पोहोचल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या तिघांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढून तिन्ही गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !