शिरपूर तालुका पुन्हा खुनाने हादरला : अनोळखीची गळा आवळून हत्या करीत शेतात फेकला मृतदेह


Shirpur taluka rocked by murder again : strangulated a stranger and threw the body in the field शिरपूर : तालुक्यातील तरडी शिवारात अनोळखी व्यक्तीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली असून अज्ञाताविरोधात थाळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून करून मृतदेह फेकल्याचा संशय
शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील गोविंद हिरालाल परदेशी यांची तरडी शिवारात शेतजमीन असून शेतात मका लागवड केली आहे. या शेतात मोतीलाल परदेशी यांना शुक्रवार, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी ओढणीने हात बांधून गळा आवळून खून केलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असता सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे यांनी पथकासह धाव घेतली. मयत अनोळखी व्यक्तीचा अन्यत्र ठिकाणी गळा आवळून खून करून मृतदेह लपवण्यासाठी शेतात फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मृत पुरुषाची दुसर्‍या दिवशीही ओळख पटू शकली नाही. मृत कोण, या प्रकरणी मोतीलाल परदेशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक उमेश बोरसे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !