भुसावळातील महिलेचा विनयभंग करीत मारहाण : एकाविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील वाल्मिक नगरातील 26 वर्षीय महिलेच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ करीत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून चापटा बुक्क्यांनी महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी एकाविरोधात

बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरातील वाल्मिक नगरातील 26 वर्षीय महिला आपल्या परीवारासह वास्तव्यास असून शुक्रवारी रात्री 8 वाजता संशयित केवल अनिल टाक याने घरासमोर येऊन जोरजोरात शिवीगाळ केली तसेच महिलेचा हात पकडून विनयभंग केला तसेच महिलेला चापटा-बुक्क्यांनी गालावर मारहाण केली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नेव्हील जॉर्ज बार्टले करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !