DySP Somnath Waghchoure जिद्दीसह चिकाटी व प्रामाणिपणाने कार्य केल्यास यश हमखास : डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे


Success is guaranteed if you work with persistence and honesty : DySP Somnath Waghchoure भुसावळ : कोणतीही कार्य हे छोटे की मोठे आपल्यावर असते. मेहंदी काढणे असो वा रांगोळी तसेच शालेय शिक्षण ते सर्व आवडीने जिद्दीने, चिकाटीने, प्रामाणिकपणे, निष्ठेने, आत्मविश्वासाने केले तर यश निश्चितच मिळू शकते. या आत्मविश्वासामुळेच तुम्ही अधिकारी बनू शकता, असे विचार भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथे व्यक्त केले. मंगळवारी श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते.

हनुमंताप्रमाणे करा कार्य : विजय तुमचाच
संस्थाध्यक्ष सोनू मांडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हनुमंताचे उदाहरण देताना हनुमंतामध्ये असलेली त्याग, सेवा, समर्पण व जिज्ञासा या भावनेने केलेले कार्य आपणही कार्य करा विजय तुमचाच राहील व निश्चितच यश तुम्हाला मिळेल, असे मार्गदर्शनात सांगितले. प्रकाश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन आशिष निरखे, भूषण भंडारी, सोनाली वासकर, जयसिंग पावरा यांनी केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे संचालक श्रीधर खनके, संचालिका मंगला वाणी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, पर्यवेक्षक संजीव पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक नाना पाटील यांनी तर सूत्रसंचालन काशिनाथ बारेला तर आभार पालक शिक्षक संघाचे सदस्य जीवन चौधरी यांनी मानले.


कॉपी करू नका.