मुलीवर वाईट नजर ठेवणार्या पतीचा प्रियकराच्या माध्यमातून खून
चौघे आरोपी जाळ्यात : धुळे गुन्हे शाखेने केली शिरपूर तालुक्यातील गुन्ह्याची उकल
Murder in Tardi Shivara edged with immoral relationship : Four along with wife caught in Crime Branch’s net धुळे : पोटच्या मुलीकडे पिता वाईट नजरेने पाहत असल्याच्या रागातून तसेच अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने पतीचाच खून केल्याची बाब धुळे गुन्हे शाखेने उघडकीस आणली आहे. शिरपूर तालुक्यातील थाळनेर हद्दीतील तरडी शिवारात खुनाचा अवघ्या चार दिवसात उलगडा झाला आहे. मुकेश राजाराम बारेला (30., चाचर्या, ता.सेंधवा, मध्यप्रदेश) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
खून करून मृतदेह फेकला
शिरपूर तालुक्यातील तर्हाडी शिवारातील गोविंद परदेशी यांच्या मक्याच्या शेतात खून करून अज्ञात युवकाचा दोन्ही मृतदेह फेकून देण्यात आला होता. धुळे गुन्हे शाखेसह थाळनेर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. मुकेश बारेला याच्या पत्नीचे संशयि सुशील पावराशी अनैतिक संबंध होते व त्यात पती अडसर ठरत होता शिवाय त्याच्या मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नसल्याने पत्नीने प्रियकराच्या माध्यमातून पतीचा काटा काढल्याची बाब समोर आली आहे.
तिकीटावरून पटली ओळख अन लागला तपास
मृतदेहाच्या खिशातील तिकिटावरून तो चोपडा येथून शिरपूरपर्यंत आल्याचे निदर्शनास आले. तिकिटावरील तारखेनंतर सीसीटीव्ही फुटेज शोधण्यात आले. या फुटेजमध्ये तरुणाबरोबर एक महिला देखील बसमध्ये बसल्याचे निदर्शनास आले यावरूनच या गुन्ह्याची उकल झाली. मयत तरुण मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील चाचर्या येथील मुकेश राजाराम बारेला असल्याचे स्पष्ट होताच मुकेश बारेलाच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीतून सुशील उर्फ मुसल्या जयराम पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगर्या लकडे पावरा या तिघांनी खून केल्याची बाब समोर येताच त्यांना गुजरात राज्यातील पोरबंदर येथून पोलिस पथकाने अटक केली. दरम्यान. मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षापासून त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता त्यामुळे संबंधित महिला ही सुशील पावरा याच्या समवेत राहत होती. मुकेश बारेला याला मुलगा, मुलगी असून मुलीकडे वेगळ्या नजरेने पाहत असल्याच्या संशयातून पत्नीने काटा काढल्याची माहिती समोर आली आहे.
चार दिवसात गुन्हा उघडकीस
हा गुन्हा धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय उमेश बोरसे, बाळासाहेब सूर्यवंशी, कृष्णा पाटील, संजय पाटील, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, रवींद्र माळी, मायुस सोनवणे, अमोल जाधव, सुनील पाटील, महेंद्र सपकाळ, किशोर पाटील, योगेश जगताप, योगेश साळवे, योगेश ठाकुर, चालक कैलास महाजन, थाळनेर पोलिस स्टेशनचे किशोर चकाण, रफिक शेख, शाम वळवी, संजय धनगर, भूषण रामोळे, ललीत खळगे, मनोज पाटील, दत्तू अहिर, सिराज खाटीक, योगेश दाभाडे, धनराज मालचे, भटू साळुंके, पगार व दिलीप मोरे आदींच्या पथकाने केली.