रावेर-यावल तालुक्यातील रीक्षा चालकांसह मालकांचा मोफत विमा


लाभ घेण्याचे अनिल चौधरी यांचे आवाहन

रावेर : अनिलभाऊ चौधरी वाहतूक जीवन विमा योजना रावेसह यावल तालुक्यातील रीक्षा चालक-मालकांसाठी सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त संख्येने त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीतील इच्छूक उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी केले आहे. चौधरी यांनी मतदारसंघाचा विकास हाच हे ब्रीद घेवून जनसेवा सुरू केली आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत त्यांनी नागरीकांच्या विविध समस्या सोडवल्याने ते जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

रीक्षा चालकांना मोफत विम्यासाठी आवाहन
रावेरसह यावल तालुक्यातील रीक्षा चालक व मालकांसाठी अनिल चौधरी यांच्यातर्फेमोफत मोफत वाहतूक जीवन विमा काढला जात आहे. जास्तीत जास्त चालकांनी लाभ घेण्यासाठी आपली नाव नोंदणी संपर्क कार्यालयात करावी, असे आवाहन करण्यात आली आहे. संपर्कासाठी यावलमध्ये सागर चौधरी (9552211164), राजू शेख (9766776607), फैजपूरमध्ये अनवर खाटीक (9730623100), पिंटू मंडवाले (8329252591), रावेरमध्ये बबलू खान 9665661225, 8830301212 यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.